चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत २० जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचा धडाका: चाकणमध्ये उघड्यावर मद्यपान व गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
चाकण पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर आणि अवैध दारू जवळ बाळगणाऱ्यांवर जोरदार कारवाई करत तब्बल २० तळीरामांना अटक केली. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर ही मोहीम हाती घेण्यात आली असून, डीबी पथक आणि चाकण पोलिसांनी विविध भागात रात्री गस्त वाढवली होती.
पोलिसांनी या कारवाईत उघड्यावर मद्यपान, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, मोठ्याने ओरडणे, वाहतुकीत अडथळा करणे अशा कारणांवरून संबंधित सर्व आरोपींवर बॉम्बे पोलिस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी अशी नियमित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनुशासन राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायणे आणि गोंधळ घालणे करण्यास प्रतिबंध असून, अशा घटकांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई भविष्यातही सुरू राहील.
Leave a comment