पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जुना कचरा बायोमायनिंग प्रक्रियेत एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पुण्यात उरूळी देवाची कचरा डेपोवर बायो-रिमेडियेशन प्रकल्प लगेच सुरू करण्याचे आदेश
पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन कार्यक्षम आणि शाश्वत करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जुना कचरा (legacy waste) शास्त्रोक्त बायोमायनिंग किंवा बायो-रिमेडियेशन प्रक्रियेत एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे उरूळ देवाची कचरा डेपोवरील जुन्या कचऱ्याच्या जागा लवकरच रिकाम्या होऊन लोकोपयोगी प्रकल्पांसाठी वापरल्या जातील.
नवल किशोर राम यांनी उरूळीस भेट दिली व कचरा प्रक्रिया प्रकल्पांची पारख केली. त्यांनी सांगितले की, महापालिका कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करणाऱ्या नवीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करत असून, मोबाईल वाहनांमार्फत घरोगरी कचरा गोळा करण्यासाठी आधुनिक प्रणाली आणणार आहे.
तसेच हडपसर व घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्रांचं आधुनिकीकरण करण्याचे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. स्मार्ट कलेक्शन सेंटर, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांसहीत पुणे महापालिका पर्यावरणीय दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापनासाठी कटिबद्ध आहे.
रिकामी झालेल्या जागा समुदायासाठी उपयुक्त प्रकल्प किंवा विकासासाठी वापरण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. आयुक्तांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील असे नमूद केले.
Leave a comment