Home राष्ट्रीय दिल्लीत लाल किल्ला कार स्फोट: दोन वर्षांपासून स्फोटकं जमा करायचा कट
राष्ट्रीयक्राईम

दिल्लीत लाल किल्ला कार स्फोट: दोन वर्षांपासून स्फोटकं जमा करायचा कट

Share
Shaheen Shahid’s Confession Links Jaish-e-Mohammed to Delhi Blast
Share

दिल्लीतील लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या डॉ. शाहीन शाहिदने दोन वर्षांच्या स्फोटकं जमावण्याच्या कटाची कबुली दिली आहे.

जैश-ए-मोहम्मदशी जोडलेली शाहीन शाहिदची कबुली; स्फोटकं गोळा करण्याचा सिक्रेट खेळ

सोमवारी ६:५२ वाजता दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या भीषण कार स्फोटानंतर देशभरातील सुरक्षा तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. या स्फोटात १० हून अधिक जणांना मृत्यू झाला तर २० हून अधिक जखमी झाले आहेत.

चौकशीदरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी शाहीन शाहिद यांचे कनेक्शन समोर आले असून तिने कबुली दिली आहे की, ती आणि तिचे सहकारी २ वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होते. या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डॉ. उमर मुहम्मद नबी असून तो पुलवामा येथील रहिवासी आहे.

शाहीनने तपासात सांगितले की, ते आणि तिचे सहकारी देशभरात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते आणि जैशच्या इशाऱ्यावर हे स्फोटक गोळा केले जात होते.

स्फोटामध्ये वापरल्या गेलेल्या कारचे सीसीटीव्ही फुटेजमधे काळा मास्क घातलेला एक माणूस दिसतो, जो डॉ. उमर असल्याचे मानले जात आहे. त्याच्यासह फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातून १३ जणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

CCTV बंद, दरवाजा तोडला! खरपुडी मंदिर चोरीचा भेद काय?

खरपुडी खंडोबा मंदिरात चोरट्यांनी २१ किलो चांदी, मुकुट, सिंहासनासह ४० लाखांचा ऐवज...

पुण्यात बनावट गुटखा कारखाना उधळला! १ कोटीचा माल जप्त, कोण आहे मास्टरमाइंड?

पुणे थेऊर फाट्यात बनावट गुटखा कारखानावर अंमली पदार्थ पथकाची धाड. १ कोटीचा...

‘आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या नाही…’ ममता बॅनर्जींची मोदी सरकारला सुनावणी

ममता बॅनर्जी यांनी मालद्यातील SIR विरोधी सभेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. बंगालींचा...

६ लाख डाउनलोड एका दिवसात! संचार साथी ॲप लोकप्रिय झाल्याने नियम बदलला का?

केंद्राने संचार साथी ॲप प्री-इंस्टॉल अनिवार्यता मागे घेतली. ॲपल विरोध, विरोधकांचा हल्ला...