Home महाराष्ट्र संत नामदेव महाराज व पांडुरंगाची पालखी पुरंदरमध्ये दाखल; संजीवन समाधी सोहळ्यासाठी जल्लोष
महाराष्ट्रपुणे

संत नामदेव महाराज व पांडुरंगाची पालखी पुरंदरमध्ये दाखल; संजीवन समाधी सोहळ्यासाठी जल्लोष

Share
Over 5,500 Devotees Join Namdev Maharaj and Panduranga Palkhi on Pilgrimage
Share

संत नामदेव महाराज आणि पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे पुरंदरमध्ये जल्लोषात स्वागत; नीरा घाटावर विधी, ५५०० वारकऱ्यांचा सहभाग

पंढरपूरहून आळंदीच्या मार्गावर संत नामदेव महाराज व पांडुरंगाचा पालखी सोहळा

संत नामदेव महाराज व पांडुरंगाची पालखी पुरंदरमध्ये दाखल; संजीवन समाधी सोहळ्यासाठी भक्तांचा उत्साह

पुरंदर (नीरा) — संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५५ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सुरू असलेला संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी सोहळा रविवारी पुरंदर तालुक्यात, नीरा येथे उस्फुर्त जल्लोषात दाखल झाला. सकाळी संत नामदेवांच्या व साडेअकराच्या सुमारास पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीतील दत्त घाटावर विठ्ठल नाम जयघोषात स्नान घालण्यात आले.

या सोहळ्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातून सद्गोपाळ वारकरी सहभागी झाले.यावर्षी पालखी सोहळ्यात साडेपाच हजार वारकरी चालत आहेत. सोहळा प्रमुख विठ्ठल वासकर यांनी टँकरपासून महाप्रसाद व भक्तांसाठी सर्व व्यवस्था पुरविली. पालखी सोबत नामदेव महाराजांचे वंशजही सहभागी झाले.

सोहळ्याचा पुढील मुक्काम वाल्हे येथे असून, नीरा येथून लोणंदमार्गे प्रस्थान केले. यावेळी शिंपी समाज व झांबरे परिवाराने महाप्रसादाचे आयोजन केले होते. नीरा विठ्ठल मंदिर आणि दत्त मंदिरात महाआरती झाली.

FAQs

  1. संत नामदेव महाराज पालखी सोहळा कुठे दाखल झाला?
  • पुरंदर तालुक्यातील नीरा येथे.
  1. या सोहळ्याच्या निमित्ताने कोणती विधी झाली?
  • नावदेव आणि पांडुरंग पादुकांना नीरा नदी घाटावर स्नान घालण्यात आले.
  1. यावर्षी किती वारकरी सहभागी झाले?
  • सुमारे ५५०० वारकरी.
  1. पालखी सोहळ्याचा पुढील मुक्काम कुठे आहे?
  • वाल्हे गावात.
  1. कोणकोणत्या जिल्ह्यातून भक्त सहभागी झाले?
  • कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटक.
Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

२१-२२ डिसेंबरला आचारसंहिता? पिंपरीत महायुतीचा मोठा ट्विस्ट येणार का?

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, राज्यातील महापालिका निवडणुका आधी होणार, २१-२२ डिसेंबरला आचारसंहिता....

महायुतीला श्वेतपत्रिकेचा धक्का! वडेट्टीवारांचा एक वर्षाचा हिशोब मागितला का?

महायुती सरकारला सत्तेत एक वर्ष: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी....

नवले पुलावर वेगमर्यादा ३० वरून ४० वर! आठवड्यातच का बदलला निर्णय?

पुणे मुंबई-बंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी ते नवले पुलावर वेगमर्यादा ३० वरून ४० किमी/तास...

CCTV बंद, दरवाजा तोडला! खरपुडी मंदिर चोरीचा भेद काय?

खरपुडी खंडोबा मंदिरात चोरट्यांनी २१ किलो चांदी, मुकुट, सिंहासनासह ४० लाखांचा ऐवज...